पेरणीच्या घाईत खतासाठी तालुक्याला जाणं म्हणजे अख्खा दिवस वाया. किसान दुकानमध्ये जवळच्या दुकानातला माल मोबाईलवरून मागवता येतो.
कसं चालतं
- तुमच्या गावाजवळची दुकानं आणि त्यांच्याकडचा माल, किमतीसह दिसतो.
- ऑर्डर दिल्यावर दुकान ती स्वीकारतं, माल पॅक करतं आणि जवळचा डिलिव्हरी पार्टनर तो घेऊन येतो.
- डिलिव्हरी पार्टनर कुठे आहे ते नकाशावर दिसतं. ८ तासांत पोहोचवण्याचं आमचं वचन आहे.
- माल हातात मिळाल्यावर पैसे द्या. डिलिव्हरीसाठी तुम्हाला मिळालेला ४ अंकी कोड सांगितल्याशिवाय ऑर्डर पूर्ण होत नाही.
ही सेवा जिथे आमची भागीदार दुकानं आहेत तिथे उपलब्ध आहे. तुमच्या भागात दुकान नसेल तर आम्हाला कळवा.