- होम
- सेवा
शेतीच्या रोजच्या कामासाठी
दर पाहणं, खत मागवणं, जनावर विकणं किंवा पिकाचा सल्ला घेणं. प्रत्येक काम काही मिनिटांत. सगळ्या सेवा मोफत; दुकानातून मागवलेल्या मालाचे पैसे फक्त डिलिव्हरीवेळी.
पीक डॉक्टर
पिकावर डाग, कीड किंवा पानं पिवळी? फोटो काढा. काय झालंय आणि काय उपाय करायचा ते काही मिनिटांत मराठीत कळतं.
अधिक वाचारोजचे बाजारभाव
३०० हून अधिक बाजार समित्यांचे कांदा, सोयाबीन, तूर, कापूस, भाजीपाला आणि फळांचे ताजे दर. कोणत्या बाजारात भाव चांगला ते एका नजरेत.
अधिक वाचाकिसान दुकान: ८ तासांत घरपोच
बियाणे, खतं, कीटकनाशकं, पशुखाद्य आणि अवजारं जवळच्या विश्वासू दुकानातून मागवा. ८ तासांत माल शेतावर, पैसे डिलिव्हरीवेळी.
अधिक वाचाखरेदी-विक्री
गाय, म्हैस, शेळी, ट्रॅक्टर, अवजारं, जमीन, शेणखत किंवा शेतीची कामं. फोटोसह मोफत जाहिरात टाका, खरेदीदार थेट फोन करतो.
अधिक वाचाशेत मोजणी (GPS)
शेताच्या बांधावरून फिरा किंवा नकाशावर कोपरे निवडा. एकर, गुंठा आणि हेक्टरमध्ये क्षेत्रफळ लगेच मिळतं.
अधिक वाचाहवामान अंदाज
तुमच्या गावाचा तासागणिक आणि पुढील दिवसांचा अंदाज. पावसाची शक्यता, तापमान, आर्द्रता आणि वारा.
अधिक वाचासरकारी योजना
शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना, त्यांची थोडक्यात माहिती आणि अधिकृत संकेतस्थळाची लिंक एकाच ठिकाणी.
अधिक वाचाकृषी पूरक व्यवसाय
दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, गांडूळ खत अशा व्यवसायांची माहिती, मार्गदर्शक PDF आणि व्हिडिओ.
अधिक वाचा