- होम
- आमच्याबद्दल
आमच्याबद्दल
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी. बाजारभाव, घरपोच खत-बियाणे, खरेदी-विक्री आणि पीक सल्ला एका मराठी ॲपमध्ये.
किसानियन्सची सुरुवात एका साध्या प्रश्नातून झाली: मेहनत शेतकऱ्याची, मग योग्य भाव आणि वेळेवर माल त्याला का मिळत नाही?
आम्ही गावोगावी हेच पाहिलं. बाजारात आज काय दर आहे ते माहीत नसतं, म्हणून व्यापारी सांगेल त्या भावात माल जातो. खत किंवा औषध हवं असेल तर अर्धा दिवस तालुक्याला जाण्यात जातो. जनावर विकायचं असेल तर ओळखीच्या चार लोकांपलीकडे खरेदीदार मिळत नाही.
म्हणून आम्ही असं ॲप बनवलं जे शेतकरी स्वतः, आपल्या भाषेत वापरू शकेल. बाजारभाव, जवळच्या दुकानातून घरपोच खत-बियाणे, जनावरे आणि यंत्रांची खरेदी-विक्री, हवामान, सरकारी योजना आणि पिकाचा सल्ला. मध्यस्थ कमी आणि निर्णय शेतकऱ्याच्या हातात.

ध्येय
प्रत्येक शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्थिर व्हावा. योग्य माहिती, योग्य भाव आणि वेळेवर मदत मिळाली तर हे शक्य आहे.
दृष्टी
पुढच्या पाच वर्षांत देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आणि शेतीसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट मिळण्याचं सर्वात विश्वासाचं ठिकाण बनणं.
ज्ञानेश भारत काळे
ज्ञानेश काळे यांनी किसानियन्सची स्थापना केली. शेतकऱ्यांच्या रोजच्या अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या आणि त्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचं ठरवलं.
त्यांचा भर नेहमी एका गोष्टीवर असतो: ॲप असं हवं की शेतकऱ्याला कोणाकडे विचारायला जावं लागू नये. कामं सोपी करणं, उत्पादकता वाढवणं आणि शेती टिकाऊ ठेवणं हे त्यांचं ध्येय आहे.
महाउद्योजक रत्नदीप पुरस्कार २०२४
किसानियन्सच्या कामाची दखल घेऊन २०२४ मध्ये ज्ञानेश काळे यांना महाउद्योजक रत्नदीप पुरस्काराने गौरवण्यात आलं.
आजच सुरुवात करा
ॲप मोफत आहे. पहिल्याच दिवशी तुमच्या पिकाचा आजचा भाव पाहा आणि जवळचं दुकान शोधा.