- होम
- प्रश्नोत्तरे
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
किसानियन्स ॲप मोफत आहे का?
हो. ॲप डाउनलोड करणं, बाजारभाव पाहणं, पीक सल्ला घेणं आणि खरेदी-विक्रीची जाहिरात टाकणं पूर्णपणे मोफत आहे. दुकानातून मागवलेल्या मालाचे पैसे तुम्ही माल हातात मिळाल्यावर देता.
८ तासांत डिलिव्हरी सगळीकडे मिळते का?
जिथे आमची भागीदार दुकानं आणि डिलिव्हरी पार्टनर आहेत तिथे. ॲपमध्ये तुमचं गाव टाकलं की जवळची दुकानं दिसतात. दुकान दिसत असेल तर त्या दुकानातून डिलिव्हरी मिळते. तुमच्या भागात दुकान नसेल तर संपर्क फॉर्मवरून कळवा.
बाजारभाव कुठून येतात?
महाराष्ट्रातील बाजार समित्यांनी प्रसिद्ध केलेल्या दरांवरून. प्रत्येक दरासोबत अहवालाची तारीख दिलेली असते. विक्रीपूर्वी आपल्या बाजार समितीकडे एकदा खात्री करा.
माझं कृषी सेवा केंद्र किसानियन्सवर कसं जोडायचं?
संपर्क पानावरच्या फॉर्ममध्ये 'दुकान म्हणून जोडायचे आहे' निवडा आणि तुमचा मोबाईल नंबर द्या. आमची टीम फोन करून दुकानाची माहिती घेईल आणि ॲपमध्ये तुमचं खातं सुरू करेल.
मी मराठीत टाकलेली जाहिरात इतरांना समजेल का?
हो. तुम्ही मराठीत लिहिलेली जाहिरात हिंदी आणि इंग्रजी वापरणाऱ्यांना त्यांच्या भाषेत दाखवली जाते. त्यांना हवं असल्यास तुम्ही लिहिलेला मूळ मजकूरही पाहता येतो.
माझी माहिती सुरक्षित आहे का?
तुमचा मोबाईल नंबर लॉगिनसाठी वापरला जातो. खरेदी-विक्रीच्या जाहिरातीत तो फक्त खरेदीदारांना फोन करण्यासाठी दिसतो. ऑर्डरची माहिती फक्त संबंधित दुकान आणि डिलिव्हरी पार्टनरला दिसते. तुम्ही केव्हाही ॲपमधून खातं हटवू शकता.