KISANIANS ॲप डाउनलोड करा
होम सेवा बाजारभाव महाराष्ट्र ब्लॉग आमच्याबद्दल संपर्क ॲप डाउनलोड करा
  1. होम
  2. संपर्क

आमच्याशी बोला

ॲपबद्दल प्रश्न, दुकान म्हणून जोडायचं आहे, डिलिव्हरी पार्टनर व्हायचं आहे किंवा भागीदारीची कल्पना. फॉर्म भरा, आमची टीम फोन करेल.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

किसानियन्स ॲप मोफत आहे का?

हो. ॲप डाउनलोड करणं, बाजारभाव पाहणं, पीक सल्ला घेणं आणि खरेदी-विक्रीची जाहिरात टाकणं पूर्णपणे मोफत आहे. दुकानातून मागवलेल्या मालाचे पैसे तुम्ही माल हातात मिळाल्यावर देता.

८ तासांत डिलिव्हरी सगळीकडे मिळते का?

जिथे आमची भागीदार दुकानं आणि डिलिव्हरी पार्टनर आहेत तिथे. ॲपमध्ये तुमचं गाव टाकलं की जवळची दुकानं दिसतात. दुकान दिसत असेल तर त्या दुकानातून डिलिव्हरी मिळते. तुमच्या भागात दुकान नसेल तर संपर्क फॉर्मवरून कळवा.

बाजारभाव कुठून येतात?

महाराष्ट्रातील बाजार समित्यांनी प्रसिद्ध केलेल्या दरांवरून. प्रत्येक दरासोबत अहवालाची तारीख दिलेली असते. विक्रीपूर्वी आपल्या बाजार समितीकडे एकदा खात्री करा.

माझं कृषी सेवा केंद्र किसानियन्सवर कसं जोडायचं?

संपर्क पानावरच्या फॉर्ममध्ये 'दुकान म्हणून जोडायचे आहे' निवडा आणि तुमचा मोबाईल नंबर द्या. आमची टीम फोन करून दुकानाची माहिती घेईल आणि ॲपमध्ये तुमचं खातं सुरू करेल.