KISANIANS ॲप डाउनलोड करा
होम सेवा बाजारभाव महाराष्ट्र ब्लॉग आमच्याबद्दल संपर्क ॲप डाउनलोड करा
  1. होम
  2. ब्लॉग
  3. माल विकण्यापूर्वी बाजारभाव कसा पाहावा? पाच सोप्या गोष्टी

माल विकण्यापूर्वी बाजारभाव कसा पाहावा? पाच सोप्या गोष्टी

किमान, कमाल आणि सरासरी दरातला फरक, आवकेचा परिणाम आणि दोन बाजारांची तुलना. विक्रीपूर्वी पाच मिनिटांत करण्यासारख्या गोष्टी.

1 मिनिटांचे वाचन लेखक: Kisanians team
माल विकण्यापूर्वी बाजारभाव कसा पाहावा? पाच सोप्या गोष्टी

बाजार समितीचा दर पाहिला की बहुतेक जण सर्वात मोठा आकडा पाहतात. पण तो दर आपल्या मालाला मिळेलच असं नाही. विक्रीपूर्वी या पाच गोष्टी पाहा.

१. सरासरी दर हाच खरा अंदाज

कमाल दर सर्वात चांगल्या प्रतीच्या थोड्या मालाला मिळालेला असतो. बहुतेक व्यवहार सरासरी (मॉडल) दराच्या आसपास होतात. म्हणून आपला अंदाज सरासरी दरावरून बांधा.

२. आवक पाहा

एखाद्या दिवशी आवक खूप वाढली की दर लगेच खाली येतो. सलग दोन-तीन दिवस आवक कमी असेल तर दर टिकून राहण्याची शक्यता जास्त.

३. जवळच्या दोन-तीन बाजारांची तुलना करा

तीस किलोमीटरवरच्या बाजारात क्विंटलमागे दोनशे रुपये जास्त मिळत असतील, तर भाडं वजा करूनही फायदा आहे का ते मोजा.

४. कल पाहा, एक दिवस नाही

एका दिवसाचा दर फसवा असू शकतो. मागील दोन आठवड्यांचा आलेख पाहिला की भाव वाढतोय की घसरतोय ते समजतं.

५. प्रतवारी करा

एकाच मालात चांगला आणि हलका माल मिसळला की संपूर्ण मालाला कमी दर मिळतो. थोडी प्रतवारी केली तरी सरासरीपेक्षा जास्त दर मिळू शकतो.

किसानियन्स ॲपमध्ये हे सगळे आकडे, तारखेसह, रोज एका ठिकाणी दिसतात.

व्हॉट्सॲपवर पाठवा